Bookstruck

माझा बाप शेतकरी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

माझा बाप शेतकरी, माळरानाचा वारकरी, टाळ-मृदंग संगतीला, सर्जा राजाच्या घुंगराचा.
बुक्का सदा त्याच्या भाळी,
काळ्या मातीचा दिमतीला.
तुडवी चिखल शेतात, संत गोरा च्या तालात.
घेतो उन्हं अंगावर,
 कसा शिपाई शूरवीर
माथी घामाचा पाझर, पिकवी धान्याचे आगर.
गिळी सूर्याचा तो ताप, माझा शेतकरी हा बाप,
माझा बाप शेतकरी.
कधी हिरव्या रानात, कधी पांढर्या शाळूत
शीळ घालीत चालतो, पाखरा हुसकाया लागतो.
गडी सोबतीला लहान, सदा कामात तल्लीन, विसरतो भुक तहान,
माझा बाप जगी महान.
गोफण चाले सपासप
हाती विळी कापाकाप
माझा शेतकरी बाप, माझा शेतकरी बाप.

« PreviousChapter ListNext »