Bookstruck

परम सुवासिक पुष्पे कोणी च...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

राग - कालंगडा ताल - धुमाळी


परम सुवासिक पुष्पे कोणी चातुर्ये गुंफिति नारी
सुगंध तेले वासित करिती शय्यावस्त्रे धरुनि करी
नानापरिचे विडे मनोहर तबकांमध्ये कोणी भरी
अंगराग ते तयार करुनी ठेविति शेजेशेजारी
खिडक्याचे वाळ्याचे पडदे भिजवुनि कोणी गार करी
गुलाबपाणी थंड करोनी शिंपित कोणी गच्चिवरी
सर्व तयारी नीट कराया दक्ष असति जन किती तरी
वाटे मज मंदिर हे करिलचि वैकुंठाची बरोबरी ॥१॥

« PreviousChapter ListNext »