Bookstruck

अग्निपाशी नवनीताची । चुंब...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अंजनीगीताच्या चालीवर


अग्निपाशी नवनीताची । चुंबकमणिसन्निध लोहाची ॥
षड्रस अन्नी क्षुधित जनाची । तीच गती माझी ॥१॥
नीरक्षीरालिंगनरूपी स्नान तुला ते घालोनी
माझ्या अवलोकनवस्त्रांनी टाकिन तनु झाकोनी
त्वत्प्रीतीच्या रक्तपणाच्या कुंकुमतिलका लावोनी
तव तनुलतिकायौवनपुष्पे घालिन तुजवर गुंफोनि
चिंतनि तुझ्या श्वास जाति ते धूपापरि घे मानोनी
मदन पेटवी तनुकर्पूरा ओवाळिन तुजलागोनी
नैवेद्यास्तव देइन माझा अधर घेई अपुल्या वदनी
कपटाचरणा केले त्याची क्षमा करी गे हरिभगिनी ॥१॥

« PreviousChapter ListNext »