Bookstruck

१ बालपण व शिक्षण

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

वडील गोपीनाथ मार्तंड काटेकर वाशीमचे राहणारे,तेथे तहसील कार्यालयात रीडर
म्हणून नोकरीस होते.सरकारी नोकरी असल्याने बदली होत असे. तेथून त्यांची
मूर्तिजापूर येथे बदली झाली. त्यांना चार अपत्य,सुधाकर हा दोन नंबरचा,त्याचा जन्म
१३-०४-१९३४ रोजी मूर्तिजापूर येथे झाला.येथून वडिलांची बदली अकोला येथे
झाली.सर्व कुटुंब सुस्थितीत होते. अकोला येथे पहिलीत प्रवेश घेतला. तिसरी पर्यंतचे शिक्षण झाले.त्याच वेळेस वडिलांना
सेवा निवृत्तीचा आदेश मिळाला.आणि समस्या निर्माण झाली.सुरुवातीस जिंनिंग कंपनीत काम केले.त्या नंतर नगर जिल्ह्यात
पुणतांबा येथे वडील नोकरीस आले.

ससुधाकरला शिक्षणासाठी मावशी कडे जावे लागले. पण मावशीचे लग्न झाल्यामुळे मामाकडे शिकाववयास यावे
लागले.मामाचे गाव ब्राह्मणी त्या ठिकाणी
पिठाची गिरणी नव्हती,तीन मैल ,दोन पायली दाळन डोक्यावर घेऊन जावे लागत असे.त्याच दरम्यान प्रपंच चालेना म्हणून
सगळे ब्राम्हणीस आले.पंधरा दिवसानंतर
आजोबांनी आईस विचारले.
अने,आईचे नाव अनुताई -किती दिवस राहणार.
आई-यांना नोकरी लागली की लगेच जाणार.
आजोबा-तू काय आमच्या तोंडाला पाने पुसायला आलीस.तू लगेच तुझ्या घरी जा.
प्रसंग आल्यावर आई वडील सुद्धा
असे वागू शकतात

« PreviousChapter ListNext »