निर्धना जी वरी , आत्मवध त...

राग शंकरा, ताल झंपा.

निर्धना जी वरी, आत्मवध ती करी । द्रव्यमय, भूवरी प्राण झाला ॥१॥

ना वसे निर्धनीं, ललितमननंदिनी । रुचिर ती राहणी सुंदराला ॥२॥

चारु वसनें जनीं प्रसरणें मोहिनी हीं सुखें कोठलीं निर्धनाला ॥३॥