या नव नवल नयनोत्सवा । बघु...

राग खमाज, ताल तिताल.

या नव नवल नयनोत्सवा । बघुनी मानस हें अनुभवत

अभिनवा मोहन कोमल भावा ॥ध्रु०॥

रणस्नेहाची, सुंदर युवती । आतां करी समाप्‍ती ।

वाटे अस्त्रचि हें रिपुहातीं । जिंकाया मम जीवा ॥१॥