गुणी दिसे धनभारें तो नवरा...

धुमाळी.

गुणी दिसे धनभारें तो नवरा;

जनीं वनी सर्वा धनीं पाही

मनीं नारी नरा ॥ध्रु०॥

दे धनासि, घे सुखासि; हीच रीत, होत प्रीत;

प्रेमझरा धनजलमय सारा ॥१॥