धनिकसुता कांत न योग्या मन...

ताल दादरा.

धनिकसुता कांत न योग्या मना ।

समरप्रीति गम सवत तिला । कांता।ध्रु०॥

धनिकसुतागर्व हराया । समरभू दे विजया ॥१॥

करिन सुखी अधना बाला । तरिच वशा युद्धकला ॥२॥