Bookstruck

आम्हीं म्हणजे....फक्त विश्वास

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter List

आम्हीं असावं स्वत्व,
आम्हीं असावं तत्व.

आम्हीं असावा स्वाभिमान,
आम्हीं असावा एकमेकांचा सन्मान.

आम्हीं असावा न्याय,
आम्हीं नसावा अन्याय.

आम्हीं असावं भावनात्मक एकत्रीकरण,
आम्हीं नसावं निराशेच चित्रण.

आम्हीं असावं अवर्णनीय देखावा,
आम्हीं नसावं वरवरचा दिखावा.

आम्हीं असावा एकमेकांचा श्वास,
आम्हीं नसावा एकमेकांचा दुःस्वास.

आम्हीं असावी आपुलकी,
आम्हीं नसावी भाऊबंदकी.

आम्हीं असावी प्रगल्भता,
आम्हीं नसावी पोकळता.

आम्हीं असावे सख्य,
आम्हीं असावी शांतता,
आम्हीं नसावी वितुष्टता.

आम्हीं असावी प्रेमळता,
आम्हीं असावी तरलता.

आम्हीं असावी ममता,
आम्हीं नसावी कोणाचीही आसवं.

आम्हीं असावं सुगम,
आम्हीं नसावं दुर्गम.

आम्हीं असावं आकाश,
आम्हीं नसावं शुन्य.

आम्हीं असावं वीर,
आम्हीं मात्र नसावं वाईट शब्दांचे दाहक तीर.

आम्हीं असावे पावित्र्य,
आम्हीं असावं चिरंतन,
आम्हीं असावं स्थिर,

आम्हींत असावं सामंजस्य,
आम्हींत नसावा मत्सरं अन परोपकाराचा प्रभाव.

आम्हींत असावं केवळ आपण,
आम्हींत मात्र नसावं मी पण,

आम्हींत असावा विश्वास, विश्वास अन फक्त विश्वास

धन्यवाद,
राहूल मंगलमुर्ती सोईन्दे,
नागपूर
+91 8380071787

Chapter List