Bookstruck

पाऊस

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

ॠतू बहराचा, 
नव्या नवलाईचा, 
सुरेल गाण्यांचा, 
गाण्यांच्या मैफिलीचा........ 

मंद गारव्याचा, 
हिरव्या क्षणांचा, 
नवीन कवितांचा, 
कवींच्या उत्साहाचा........... 

जुन्या आठवणींचा, 
हळव्या प्रसंगांचा, 
गुलाबी हवेचा, 
हवेतील जादूचा.......... 

नाजूक हिरवळीचा️, 
निसर्गाच्या सौंदर्याचा, 
ॠतू हा पावसाचा, 
मनमुराद आनंदाचा........ 

सानिका सुतार

« PreviousChapter List