Bookstruck

35 निरहंकारी शंकराचार्य

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

शंकराचार्य एकदा केदारनाथाच्या दर्शनासाठी हिमालयातून प्रवास करीत होते .त्यांच्या बरोबर त्यांचा शिष्यगणही होता .अलकनंदाच्या काठी स्नानसंध्या करीत असतांना त यांचा एक शिष्य म्हणाला .या अलकनंदेच्या वाहत्या पाण्यापेक्षा जास्त स्वामींचे ज्ञान आहे .त्यावर शंकराच्या यांनी स्मित करीत त्यांची काठी पाण्यामध्ये बुडविली व नंतर वर काढली .त्यांनी शिष्याला विचारले की या काठीने किती पाणी बाहेर काढले .शिष्य म्हणाला जेमतेम एखादा थेंब असेल त्यावर शंकराचार्य म्हणाले की एकूण प्रचंड ज्ञानामध्ये माझे ज्ञान या एखाद्या थेंबा एवढेच आहे. 
वरील गोष्ट माझ्या वाचनात आली आणि मला त्यावरून अल्बर्ट आइन्स्टाइन यांची अशीच गोष्ट आठवली. एवढी प्रचंड बुद्धिमत्ता व महान शास्त्रज्ञ असूनही  त्यांच्या अंगी नम्रता वाखाण्याजोगी होती .ते एकदा समुद्र किनारी फिरत असताना  त्यांची एकाने अशीच स्तुती केली त्यावर ते म्हणाले ."समुद्र किनारी जेवढी वाळू पसरलेली आहे त्यातील एका कणाएवढेही माझे ज्ञान नाही "ही नम्रता केवळ दाखवण्यापुरती नव्हती तर ती आतूनच आलेली होती .निरनिराळ्या कालखंडातील निरनिराळ्या प्रदेशातील महान लोकांचे अंतरंग व विचार पद्धतीत साम्य आढळून येते.

अशा कथांचे तात्पर्य सांगावयाचे नुसते कथा वाचून ते(तात्पर्य ) अंत:करणाला जाऊन भिडले पाहिजे तरच उपयोग .
असे असावे किंवा असे वागावे असे सांगून काही उपयोग होत नसतो .
स्पंज ज्याप्रमाणे पाणी टिपून घेतो त्याप्रमाणे एखादी व्यक्ती जो बोध घ्यावयाचा तो आपोआपच घेते. 
३०/११/२०१८ प्रभाकर  पटवर्धन 

« PreviousChapter ListNext »