Bookstruck

60 श्रद्धा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आई वडील संत महंत  राजकीय पुढारी


विशेषत देव जिझस अल्ला महावीर बुद्ध इत्यादी  यांच्यावरील विश्वास म्हणजे श्रद्धा .मी देव मग तो कोणत्याही धर्मातील असो त्यावरील श्रध्देबद्दल विचार करणार आहे .  मूल जन्माला येते त्यावेळी ते निरागस असते .घरातील व समाजातील एकूण वातावरणातून त्याच्यावर देवासंबंधी निरनिराळे संस्कार होत असतात.देव असे करील तसे करील नमस्कार कर नमाज पढ देव चांगले करील वाईट करील असे सांगून व घरातील एकूण दिनचर्या व रुढी यामधून त्यांच्यावर संस्कार होत असतात या सर्वांमधून त्याच्या मनात देवाबद्दल काही कल्पना आराखडा निर्माण होतो देव्हारा देव पूजा रूढी कर्मकांड यामुळे या कल्पनांचे जास्त दृढीकरण होते हे हळूहळू सर्व मनात इतके मुरते की देव निश्चित आहेत व तो या स्वरूपाचा आहे 
याबद्दल व्यक्तीची बालंबाल खात्री पटते देव परमेश्वर अल्ला ख्रिस कसा आहे ते आपणच  कल्पनेने निर्माण केलेले एक चित्र असते .
एखादा म्हणेल की ठीक आहे परंतु जर त्यामुळे व्यक्तीला सुख व आनंद विश्वास व खात्री मिळत असेल तर काय बिघडले जर व्यक्ती व समाज आपापल्या श्रद्धा जपेल व दुसऱ्यांच्या श्रद्धेच्या आड येणार नाही तर विशेष काही बिघडणार नाही परंतु आजपर्यंत जर इतिहास पाहिला तर जगात धर्माच्या नावावर अतोनात रक्तपात झालेला आढळून येतो रोमन्स ख्रिश्चन्स क्रुसेडर्स मुस्लिम्स  कित्येक रानटी जमाती यांनी एवढा रक्तपात केलेला आहे की धर्म नको असे वाटू लागले आहे .श्रद्धेमुळे जर अशा गोष्टी होत असतील तर तशी श्रद्धा काय कामाची? 

« PreviousChapter ListNext »