Bookstruck

आत्मसाक्षात्कार

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एकदा एक अत्यंत गरीब माणूस, ज्याला कधीच पुरेसे अन्न मिळाले नाही, तो जीवनाला कंटाळून एका महात्म्याकडे गेला आणि म्हणाला, "महाराज, मी पैशा अभावी खूप अस्वस्थ आहे, खाण्यासाठी अन्न नाही, घालायला कपडे नाहीत, कृपया असे काहीतरी करा. ज्यामुळे मी श्रीमंत होऊ शकेन."

महात्म्याला त्याची दया आली. महात्म्याकडे पारसमणी होता. त्याने तो त्या गरिबाला दिला आणि म्हणाला,

" जा, त्यातून तुला हवे तेवढे सोने निर्माण कर "

पारसमणी मिळाल्यानंतर गरीब व्यक्ती आनंदी झाली त्याच्या घरी आला. पारसमणी वापरून त्याने भरपूर सोने निर्माण केले आणि नंतर तो श्रीमंत झाला.त्याची गरिबी दूर झाली.

बरीच वर्षे लोटली. तो श्रीमंत होतच गेला. पण आता त्याला श्रीमंतीचा त्रास होऊ लागला. दररोज नवीन दु:ख, सत्तेचे दु:ख, चोरांची भीती, धन रक्षणाचा त्रास! इतका श्रीमंत होऊन सुद्धा तो वैतागला आणि त्याने हार मानली.

हार मानल्यानंतर तो संताकडे गेला आणि म्हणाला, "महाराज, तुम्ही माझे गरिबीचे दु:ख दूर केले, परंतु श्रीमंती मध्येही दु:ख आहे हे मला माहीत नव्हते. त्या दुःखांनी मला पूर्णपणे घेरले आहे. कृपा करा. मला या दु:खापासून  वाचवा. "

संत म्हणाले, " मी तुला दिलेला पारसमणी माझ्याकडे परत आण, मग तुझे दु:ख दूर होईल."

तो माणूस म्हणाला, "नाही महाराज, आता मला पुन्हा गरीब व्हायला आवडणार नाही, पण तुम्ही मला असे सुखाचे वरदान द्या, जे दारिद्र्य आणि श्रीमंती यांमध्ये समान प्रमाणात आढळते, जे मृत्यूच्या वेळीही कमी होणार नाही."

संत म्हणाले, "असे सुख केवळ भगवंताच्या भक्तीमध्ये आहे. केवळ आत्मज्ञानात आहे. तु आत्मज्ञान प्राप्त कर." असे म्हणत महात्म्याने त्याला आत्मज्ञानाचा उपदेश केला. त्याला आत्मसाक्षात्कार झाला आणि आणि तो परिपूर्ण झाला.

गीतेत म्हटलेच आहे- ‘तोच जीव धन्य तो आहे जो आत्मज्ञानाने आत्मसंतुष्ट आहे.’

« PreviousChapter ListNext »