Bookstruck

गृहस्थ आणि संन्यासी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

दुपारी एक विद्वान संत कबीर यांच्या कडे आले आणि म्हणाले, "महाराज, मी गृहस्थ बनावे की साधू?"  

त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देता कबीर आपल्या पत्नीला म्हणाले, "दिवा लाव आणि आण"

मग कबीर त्या विद्वानाला एका वृद्ध साधूच्या घरी घेऊन गेले आणि त्याला हक मारली  " महर्षी कृपया खाली या, मला आपल्याला भेटायचे आहे."

महर्षी वरून खाली आले आणि दर्शन देऊन पुन्हा वर निघून गेले. ते नुकतेच वरच्या मजल्यावर पोहोचले असतील इतक्यात संत कबीर यांनी पुन्हा त्यांना बोलावले आणि म्हणाले, "एक काम आहे."

जेव्हा साधू खाली आले तेव्हा कबीर म्हणाले, "एक प्रश्न विचारायचा होता, पण विसरलो."

साधू हसले आणि म्हणाले, काही हरकत नाही, आठवून ठेवा. असे म्हणत ते पुन्हा वरच्या मजल्यावर गेले.

संत कबीर यांनी त्या वृद्ध महर्षींना अनेक वेळा खाली बोलावले आणि ते आले/.

मग कबीर त्या विद्वानाला म्हणाले, "जर तुम्हाला या साधूंसारखी क्षमाशीलता मिळू शकते तर मग भिक्षु बना आणि जर तुम्हाला माझ्यासारखी  आदर्श पत्नी जी दिवसा दिव्याची गरज नसताना देखील दिवा मागितला असता अधिक प्रश्न न विचारता भर दिवसा  दिवा घेऊन येते अशी पत्नी लाभली तर संसारी बना .".

« PreviousChapter ListNext »