Bookstruck

श्री मयुरेश्वर मोरगाव पुरंदर पुणे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

श्री मयुरेश्वर हे गणपती मंदिर करा नदीच्या काठावर वसलेले आहे.

श्रीगणेशाचे हे स्थान महत्त्वाच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अग्रस्थानी आहेया गावी मोरांची संख्या फार जास्त होती म्हणून या गावाचे नाव मोरगाव असे ठरले

गणेशाचे मयूर हे वाहन असून हा मयुरेश्वर गणपती आहे.  सिंधूला सुरांच्या वधासाठी बंदिवान देवाने गणेशाचे स्तवन केले

तेव्हा गणेशाने पर्वताच्या पार्वतीच्या पोटी मयूरेश्वर नावाने जन्म घेतला व सिंदुरासुराचा वध केला. ही गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख असून डाव्या सोंडेची आहे व डोळ्यात आणि बेंबीत हिरे आहेत.

या मुर्तीच्या सोबत रिद्धी सिद्धी ही आहेत. या मंदिरात गणेशासमोर मोठा महाकाय नंदी स्थापलेला आहे.

भाद्रपद माघी चतुर्थीप्रमाणेच सोमवती अमावस्या व विजयादशमीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.

पुण्यापासून मोरगाव हे चौसष्ठ किलो मीटरचे अंतर आहे. पुणे स्वारगेटवरुन जेजुरी मार्गे मोरगावला जाता येतं.

पुणे दौंड रेल्वे मार्गावरील केडगाव हे रेल्वे स्टेशन आहे किंवा पुणे सातारा या रेल्वेमार्गावर नीरा हे रेल्वे स्टेशन आहे तिथून मोरगावला येतात.

मोरगाव-चौफुला-दौंडमार्गे सिद्धटेकला ही जाता येतं.

« PreviousChapter ListNext »