Bookstruck

प्रकरण ३

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

२१.एखाद्या रस्‍त्‍यावरची खिडकी किंवा दार जळताना पाहिल्‍यास- जवळच्या नातेवाईकांमधील पुरूषांपैकी कुणाचे तरी मरण जवळ आहे असे समजावे.
२२.एखाद्या घराचा मागचा भाग जळताना पाहिल्‍यास- जवळच्या किंवा ओळखीच्या स्त्रियापैकी कुणाचे तरी मरण जवळ आले आहे असे समजावे.
२३.आसन, बिछाना, पालखी किंवा गाडी इ. वाहने, आपले शरीर, आपले घर यावैकी कशाला आग लागली आहे असे पाहून समजा जाग आली- झोपेतून अश्याप्रकारे जागे झालेल्या माणसावर लक्ष्‍मी सदासर्वकाळ प्रसन्‍न राहील.
२४.घराच्या दिवाणखान्‍यातील खांब आणि पलंगाचे खूर असं काही सर्व जळताना पाहिल्‍यास- मोठे आपत्य प्रसिद्ध होईल. 
२५.आपल्‍या जवळच्या नातेवाईकांचे किंवा मित्रांचे वापरतात ते कपड्यांना आग लागली आहे असे जळताना पाहिल्‍यास- ज्या माणसांना स्वप्नात पहिले आहे त्यांना.
२६.आपल्या झोपायच्या पलंगाला आग लागलेली पुरूषांनी पहिली तर त्‍याच्या बायकोला आणि स्‍त्रीने पाहिलं तर तिच्या नव-याला दु:ख मिळते.
२७.आपण स्वतः जळून काळे झालो आहोत किंवा अंगावर चट्टे उठले आहेत असे दिसल्यास- दु:ख वाटेला येईल आणि लोकांमध्ये मत्‍सर वाढेल.
२८.आपले बोट किंवा पाय जळताना पाहिल्‍यास- आपण जे काही काम करत आहोत त्याचा उद्देश वाईट आहे असे समजावे.
२९.कोठारात ठेवलेली धान्‍याची रास जळताना दिसल्यास- अतिवृष्टीच्या मारने शेतातील पिके किंवा झाडांचे नुकसान होईल. 
३०.कोठारातल्या राशीला आग लागली आहे पण, धान्‍य सुरक्षित आहे असे दिसल्‍यास- पुष्‍कळ पीक येईल.
३१.आजूबाजूच्या जागेला किंवा आपल्या प्रदेशाला आग लागल्याचे स्वप्न पाहिल्यास- त्या जागेत दुष्‍काळ पडेल किंवा कुठल्याश्या रोगाने आजूबाजूच्या लोकांचे वाईट होईल असे समजावे.

« PreviousChapter List