Bookstruck

मोहिते कुळ

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

विजयाभि नामक राजा सोमवंशी त्याचे कूळ, उपनाम मोहिते, गार्ग्य ऋषि गोत्र, कुळदैवत खंडेराव, अलक्ष मुद्रा, बीज मंत्र, तक्त गादी मंदोसर, पांढरी गादी, पांढरे निशाण, पांढरा वारू, विवाह (लग्न) कार्यास देवक कळंबाचें. विजयादशमीस (दसऱ्यास) शस्त्र पूजणें तेगा. यांची कुळे येणेप्रमाणे:-मोहिते, माने, कामरे, कांठे, काठवटे असे हे मोहिते जाणावे. क्षत्रियधर्म चालवणे, सोंवळे धूतवस्त्र परिधान करणे, यज्ञोपवीत (जानवें) घालणे, गोग्रास देणे, पुराण श्रवण करणे. असे मोहिते जाणावे.

मोहिते कुळाचा पाया सोमवंशीय राजा विजयभि याने रोवला. मोहिते कुळाचे गोत्र गार्ग्य आहे. या कुळाची गादी(सत्ता) मंदोसर, मध्यप्रदेशची आहे. या कुळाच्या सिंहासनच्या गादीचा रंग पांढरा आहे. या कुळाचा झेंडा पांढरा असून त्यावर अलक्षमुद्रा असलेला पांढरा घोडा आहे. या कुळाचा यल्गार(एल्गार) बीज मंत्र आहे. विवाह(लग्न) कार्यात या कुळात कळंबाचे झाड किंवा फांदी देवक म्हणून पूजतात. विजयादशमीला या कुळातल्यांनी शस्त्र पूजा टाळावी.  मोहिते कुळामध्ये माने, कामरे(काम्रे), कांठे, काठवते(काठवडे) हे येतात. यांचे कार्य त्यांचा क्षत्रिय धर्म पाळणे आहे. सोवळे धुतलेले कपडे परिधान करावे. जानवे घालावे. गाईची काळजी घ्यावी तिला अन्न-पाणी द्यावे. पुराण ग्रंथ ऐकावेत.    

« PreviousChapter ListNext »