Bookstruck
Cover of पोफळीतल्या चेटकीणीच्या झिंज्या

पोफळीतल्या चेटकीणीच्या झिंज्या

by अक्षय मिलिंद दांडेकर

जेव्हा ते घराच्या दिशेने परत येत होते, तेव्हा त्यांनी पोफळीच्या झाडावरून खाली लटकलेला लांब केसांचा एक झुबका पहिला. झाडावरून लटकत असलेला जाडजुड लांब केसांचा झुबका पाहून त्यांना लगेच समजले की काही किरकोळ गोष्ट नाही.त्यांना आधी खूप भीती वाटली पण बुवा निःसंशयपणे खूप धैर्यवान व्यक्ती आहेत हे मान्य करावेच लागेल. त्यांनी लगेच कोयता बाहेर काढला जो ते त्यांच्या कनवटीला अडकवून ठेवायचे. क्षणार्धात त्यांनी कोयत्याने लांब केसांच्या झुबक्याचे टोक कापले आणि तिथून पळ काढला. केस कोयत्याने कापताच त्यांना एक विचित्र आणि भयंकर किंचाळी ऐकू आली. त्यांच्या म्हणण्यानुसार ती किंचाळी इतकी जोरदार होती की तिच्यामुळे कानाचे पडदे फाटतील. त्यांच्या अंगावर काटा आला होता. त्यांना दरदरून घाम फुटला होतं. ते धापा टाकत टाकत घरात पळून आले आणि लगेच आत जाऊन दरवाजा बंद केला.

Chapters

Related Books

Cover of सापळा

सापळा

by अक्षय मिलिंद दांडेकर

Cover of झोंबडी पूल

झोंबडी पूल

by अक्षय मिलिंद दांडेकर

Cover of सोमण सरांचे भूत

सोमण सरांचे भूत

by अक्षय मिलिंद दांडेकर

Cover of अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा

अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा

by अक्षय मिलिंद दांडेकर

Cover of सुसाईड नोट

सुसाईड नोट

by अक्षय मिलिंद दांडेकर

Cover of वेंडीगो

वेंडीगो

by अक्षय मिलिंद दांडेकर

Cover of झुंजूमुंजू

झुंजूमुंजू

by अक्षय मिलिंद दांडेकर

Cover of बेपत्ता पाय

बेपत्ता पाय

by अक्षय मिलिंद दांडेकर

Cover of भूत्याचा वाडा

भूत्याचा वाडा

by अक्षय मिलिंद दांडेकर

Cover of शेंद्री

शेंद्री

by अक्षय मिलिंद दांडेकर