Bookstruck

गांधी आणि आपण...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

भावा-भावा मध्ये
बांदासाठी खून होतो,
मोहमद अली जिना
पाकिस्तान तोडून नेतो....

सातबारा स्वतःचा
स्वतः बेजार करून जातो,
फाळणी करून पुन्हा
महात्मा येथे जन्म घेतो....

खुनासाठी भावाच्या
जन्मठेप भाऊ भोगतो,
राष्ट्रपिता बनून एक
दुसरा पाकचा जनक होतो....

रक्त रंजित क्रांतीचा
जेव्हा उगम होतो,
अहिंसेच्या पडद्या आडून
पुन्हा गांधी जन्म घेतो....

देशद्रोह करून जिना
गांधींचा भाऊ होतो,
स्वार्था साठी देशाची
फाळणी करून जातो....

संजय सावळे

« PreviousChapter ListNext »