Bookstruck

स्मशान घाट...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पाऊस पडतो रान भिजवतो
विहीरी भरतो काठोकाठ,
माणूस राहतो,एकटा जळतो
जळून उरतो,स्मशान घाट ....

धूर उडतो,गोंगाट उठतो
सरते जीवन पाठोपाठ
शब्द दडतो, सूर हरवतो
मातीत बुजतो,स्मशान घाट...

दहावा घडतो,पिंडदान करतो
पुन्हा धरतो नदी काठ ,
तेरावा सरतो,निश्चल पडतो 
दुःखात रडतो स्मशान घाट...

एकटा उरतो,भेटीत जाळतो
भोवती मोजतो फुटके माठ,
पाऊस पडतो,वाहून जातो
शेवटी उरतो स्मशान घाट...

संजय सावळे

« PreviousChapter ListNext »