Bookstruck

वास्तुशास्त्र- शास्त्र कि थोतांड?

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

वास्तुशास्त्र सत्य आहे कि असत्य आहे हे जर पडताळून पाहायचे असल्यास तर पुढीलप्रमाणे त्याचे विवेचन करता येईल

ईशान्येत देवतत्व असते. वस्तूच्या ईशान्य दिशेत जर जलस्त्रोत किंवा साठा  असेल, तर उर्जेचा नैसर्गिक समतोल साधला जातो. यामुळे समृद्धी येते.

उदाहरणार्थ जपान च्या ईशान्येत प्रशांत महासागर आहे. जपान देशाच्या समृद्धीचे, प्रगतीचे कारण ईशान्य दिशेतील प्रशांत महासागर हे आहे.

मुंबई नगरीचे उदाहरण पाहिले तर आग्नेय दिशेला आण्विक प्रकल्प आहे आणि  ईशान्येत अरबी समुद्र आहे. त्यामुळे अग्नि आणि जल या तत्त्वांचे नैसर्गिकदृष्ट्या संतुलन साधलेले आहे. मायानगरी मुंबई आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. आर्थिक,औद्योगिक समृद्धी आणि विकास यांनी परिपूर्ण असे हे शहर आहे. संपूर्ण भारत देशातून इकडे प्रचंड प्रमाणात लोकांची आवकजावक होत असते.त्यामुळे मुंबईची समृद्धी दिवसागणिक वाढत आहे

« PreviousChapter ListNext »