Bookstruck

आवारातील रचना

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आवारातील रचना पुढीलप्रमाणे असावी

  1. मुख्य वास्तुचे बांधकाम हे भूखंडामध्ये नैऋत्येत करावे.
  2. उत्तर आणि पूर्वे दिशेकडे जास्त मोकळी जागा असावी.
  3. ईशान्य दिशेत तुळशी वृंदावन असावे.
  4. पोहोण्याचा तलाव, धबधबा, कारंजे, उत्तर, पूर्व अथवा ईशान्य दिशेत असावे.
  5. बगीचा किंवा हिरवळ, उत्तर, पूर्व अथवा ईशान्य दिशेला असावेत.
  6. वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर झाड, विजेचा खांब, गटार, नाली, खड्डा किंवा उकिरडा नसावा.
  7. आऊट हाऊस, गॅरेज वगैरेंसाठी वायव्य अथवा आग्नेय दिशेत व्यवस्था करावी.
  8. वायव्य भागात वाहनतळ अथवा पार्कींगची व्यवस्था करावी. बेसमेंटमध्येही पार्कींगची सोय होऊ शकते.
  9. घराच्या छपराचा उतार ईशान्य दिशेकडे असावा. पावसाचे पाणी घरावर उत्तर, पूर्वे, ईशान्य या दिशांकडे पडणारे किंवा ओघळणारे असावे.
  10. बाल्कनी, व्हरांडा वगैरे सोयी उत्तर, पूर्व, ईशान्य दिशेत असावेत.
« PreviousChapter ListNext »