Bookstruck

प्लॉटचे योग्य व अयोग्य प्रकार

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

वास्तुशास्त्राप्रमाणे जमिनीच्या प्लॉटचे योग्य व अयोग्य प्रकार पुढीलप्रमाणे आहेत

वास्तुशास्त्रात आयताकृती भूखंड हा योग्य भूखंड म्हणून ओळखला जातो. असा भूखंड शुभ असतो व तो निश्चितच लाभदायक ठरतो. संपन्नता, समृद्धी व कार्यसिद्धी देतो.

चौरस भूखंडात चारही बाजू सारख्याच असतात. या भूखंडाचे सर्व कोपरे ९० अंशाचे असतात. भूखंडाचा चौरसाकृती आकार शुभ आणिलाभदायक असतो. या भूखंडात राहिल्याने जीवन सुखी व समृद्ध होते. वंशवृद्धी होते. उत्त्तम आरोग्य लाभते.

ज्या भूखंडाचा आकार दर्शनी भागात लहान असतो आणि मागील भाग दर्शनी भागापेक्षा मोठा असतो त्या भूखंडाला गोमुखी भूखंड म्हणतात. असा भूखंड लाभदायी असतो.

भूखंड त्रिकोणी आकाराचा नसावा. हा भूखंड अशुभ फळं देतो. यात सुख, समृद्धी, सौख्य लाभत नाही. संकटं येत राहतात. मन:स्वास्थ्य लाभू शकत नाही.

वर्तुळाच्या आकाराचा भूखंड काही  प्रमाणात चांगली फळे देतो. त्यामुळे शक्यतो असा भूखंड असला तरी मात्र बांधकाम चौरसच असावे. शैक्षणिक प्रगती चांगली राहते.

चारही बाजू विषम अथवा वेगवेगळ्या लांबीच्या ज्या भूखंडाच्या असतात असा प्लॉट अशुभ ठरतो. असा भूखंड धनक्षय करतो आणि समृद्धी नष्ट करतो. त्यामुळे अशा आकाराचा भूखंड टाळावा.

« PreviousChapter ListNext »