Bookstruck

भाग-४

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

राजेशने पुढे जाऊन त्या तिघीना थांबवले

"थांबा..... मी पुढे जातो, आधी जाऊन बघतो कोणी आहे का, मग मी तुम्हाला इशारा करतो, मग तुम्ही सगळे माझ्या मागे मागे या"  राजेश बेधडकपणे म्हणाला.

माझ्या मुलीला एवढा चांगला नवरा मिळणार, तो सगळ्यांची किती काळजी घेतो, याचा आकांक्षाला आनंद झाला. तिघी तिथेच थांबल्या.

राजेश पुढे निघाला, चालता चालता त्याने वाडयाच्या गेटकडे पाहिले. वाडयाच्या  भल्यामोठ्या गेटला मोठे सरकारी कुलूप होते. पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेले, सडलेले कुलूप आणि दार सर्व काही हिरव्या शेवाळ्याने भरलेले आणि गंजलेले होते. वाडयाच्या बाजूला एक विहीरही होती.घनदाट जंगलाच्या मधोमध एक विहीर पाहून राजेशला आश्चर्य वाटले. एका झाडाला बोर्ड लटकवलेला होता ज्यावर सरकारी सूचना होत्या.                        

वाड्याच्या भिंतींवर लिहिलेले होते.

मृत्यू!

भूत्याचा वाडा!

हे बघून का कोण जाणे पण राजेश अजिबात घाबरला नाही. त्याने हाताने इशारा करून तिघींनाही आपल्याजवळ बोलावले.

"राजेश बोलवतोय, चल जाऊया." रिया

तिघी राजेशकडे गेल्या. विहीर पाहून आकांक्षा म्हणाली

“ही तीच विहीर आहे ज्याबद्दल असे सांगितले जाते की आत्महत्या केलेल्या ५० जणांना हिच्यात गाडले गेले होते. आकांक्षाने टफीला उचलुन घेतले.

"तुम्ही सर्वजण थांबा, मी त्या विहिरीवर जाऊन बघते," सोनिया पुढे होत म्हणाली.

इतक्यात अचानक सोनियांसमोर एक मेलेली कोंबडी पडली जी काळ्या रंगाने रंगवली होती. भीतीने सोनियांचा श्वास रोखला गेला. राजेशने सोनियाला मागे खेचले आणि ते सर्व जण मेलेल्या कोंबडीकडे आश्चर्याने पाहत होते.

"चला तुम्हा सगळ्यांना मी म्हणाले इथे धोका आहे पण तुम्ही माझे ऐकले नाही, चला लवकर... परत जाऊया"

आकांक्षा सोनियाला मागे ओढत म्हणाली.

"आई, प्लीज आता पुन्हा सुरुवात करू नकोस..."

हात सोडवत सोनिया रागाने म्हणाली.

“राजेश, रिया, तुम्हाला भीती वाटते तर तुम्ही सर्वजण इथेच थांबा, मला आत जाऊन पाहण्याची खूप इच्छा आहे”  सोनिया म्हणाली.

"नाही आपण सगळे एकत्र जाऊ"

राजेश आणि सोनियाचा हात धरून रिया पुढे निघाली.

रिया म्हणाली, “काकू तुम्ही आमच्या मागे राहा.”

“सिनेमात तर गेट आपोआप उघडते, इथे कुलूप तोडावे लागेल असे वाटतय ” राजेशने वातावरण हलके फुलके करण्यासाठी डायलॉग मारला.

सर्वजण एकत्र पुढे निघाले, तेवढ्यात अचानक विहिरीत पाण्याचा छप छप आवाज येऊ लागला.

त्या सगळ्यांना  छातीत धड धड व्हायला लागले. टफीने जोरजोरात भुंकायला सुरुवात केली

« PreviousChapter ListNext »