आई...

उन्ह पाऊस रोज झेलीता
रापुन गेलो आई,
हरवलेल्या गर्दीत तुला
कुठे शोधू आई...

चांदण्या रात्रीस मज
कोण ऐकवी अंगाई,
कोण पुरवी लाड माझा
कुणास म्हणू आई...

काय गुन्हा केला मी
सोडूनि गेलीस बाई,
क्षणोक्षणी आसवे येता
कुणास म्हणू आई...

तिमिरात उभी एकटी
देव्हाऱ्यातली समई,
दिपणारा मी एक तारा
कुणास दावू आई...

संजय सावळे..