Bookstruck

तू आणि दर्पण...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अंतरीच शोधतो तुझ्या
श्वासागणिक श्वासांना,
कसा थोपवू तुजसाठी
मावळत्या सांज किरणांना...

बेमान झाल्या वाटा
रानात हरवून पावलांना,
घे सामावून ओल्या
भिजलेल्या रानांना...

बरसू दे पुन्हा नव्याने
मृगतल्या त्या सरींना,
हातात हात आपले
चिंब ओले होतांना

गारवा बनून झोंबतो 
झेलतो कधी स्पंदनांना,
पुन्हा आठवतो तुज
दर्पणात पाहून आसवांना...

संजय सावळे

« PreviousChapter ListNext »