Bookstruck

ती रात्र अमावस्येची....

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

जेव्हा कधी पाहतो मी
लाल तांबडा सूर्यास्त,
रक्तरंजित क्रांतीचा
असतो तो एक अस्त...

निळ्या गडत आभाळात
किती लुकलुकतात तारे,
एक पौर्णिमेचा चंद्र मी
ओवाळीत होते मज सारे...

खूप सारे होते पांगलेले
होणार होता जेव्हा माझा अस्त,
न्हाऊन निघून गेले सारे
दूधाळ प्रकाशात मस्त....

दुपार होता मज
नसे साथ कुणाची,
एकटाच न्हाहळतो मी
ही रात्र अमावस्याची.....

संजय सावळे

« PreviousChapter List