Bookstruck

माझ्या सुंद्रीचं लगीन

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

माझ्या सुंद्रीचं लगीन

वराडी कोण कोण येणार, माझ्या सुंद्रीचं लगीन

भाऊ म्हणे मी भाऊ, आणीन नवरा पाहून

माझ्या सुंद्रीचं लगीन

बहिण म्हणे मी बहीण, करवली मी होईन

माझ्या सुंद्रीचं लगीन

बाप म्हणे मी बाप, खर्चीन हुंडा लाख

माझ्या सुंद्रीचं लगीन

आई म्हणे मी आई, करीन लग्नात घाई

माझ्या सुंद्रीचं लगीन

चुलता म्हणे मी चुलता, येईन जेवणापुरता

माझ्या सुंद्रीचं लगीन

चुलती म्हणे मी चुलती, येईन वरातीपुरती

माझ्या सुंद्रीचं लगीन

मावसा म्हणे मी मावसा, बसेन दागिन्यासरसा

माझ्या सुंद्रीचं लगीन

मावशी म्हणे मी मावशी, फराळाचे माझ्यापाशी

माझ्या सुंद्रीचं लगीन

मामा म्हणे मी मामा, येईन सर्व कामा

माझ्या सुंद्रीचं लगीन

भट म्हणे मी भट, धरीन अंतरपाट

माझ्या सुंद्रीचं लगीन

भटीण म्हणे मी भटीण, सगळ्याच पोळ्या लाटीन

माझ्या सुंद्रीचं लगीन….

« PreviousChapter ListNext »