Bookstruck

नणंदा भावजया दोघीजणी घरात नव्हतं तिसरं कोणी ।

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

नणंदा भावजया दोघीजणी । घरात नव्हतं तिसरं कोणी ।
'शिंक्यावरचं लोणी । खाल्लं कोणी ?

'मी नाही खाल्लं । वहिनीनं खाल्लं ।
आतां माझा दादा येईल ग । दादाच्या मांडिवर बसेन ॥'

'दादा तुझी बायको चोरटी ।'
'असु दे माझी बायको चोरटी ।'

'घे काठी लाग पाठीं ।'
'घेत नाही काठी । लागत नाही पाठी ।
घरादाराची लक्ष्मी मोठीं ॥'

'कोथिंबीरी बाई ग, आता कधी येशील ग?'
'आता येईन चैत्रमासी', चैत्रा चैत्रा लौकर ये,

हस्त घालीन हस्ताला, देव बसवीन देव्हारा,
देव्हार्‍याच्या चौकटी, उठता  बसता लाथा बुक्की

कमळे कमळे दिवा लाव
दिवा गेला वार्‍यानं

कमळीला नेलं चोरानं
चोराच्या हातातुन सुटली

बाजेखाली लपली
सासुबाईंनी देखली
मामांजीनी ठोकली…

« PreviousChapter ListNext »