Bookstruck

कण कण माझ्या तनुचा मिरवी ...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कण कण माझ्या तनुचा मिरवी या मातीची द्‌वाही

मनात माझ्या आभाळाची गाते नित्य निळाई

मी या पात्यांतून वाढतो

फुलाफुलांतुनि मीच हासतो

सूरच माझा झर्‍याझर्‍यांतुनि झुळझुळ वाहत जाई

स्वप्ने माझी उषा पाहते

सागरात मम हृदय गर्जते

हाळी दयाया सूर्य मला ये, तुडवित डोंगर-राई

समुद्रवसना हिमकिरीटिनी

भारतभूमी माझी जननी

खडे पसरिले माणिकमोती होती तिचिया पायी

कण कण माझ्या तनुचा मिरवी या मातीची द्‌वाही

« PreviousChapter ListNext »