Bookstruck

भिऊन पावलं टाकू नका , भ...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

भिऊन पावलं टाकू नका,

भिऊन डोळे झाकू नका !

भिणार्‍याला प्रकाश कोणी बघू देत नाहीत;

भिणार्‍याला इथे कोणी जगू देत नाहीत !

गरुडाहून झेपावणारा प्रत्येकात प्राण आहे;

विश्‍वास ठेवा, तुमच्या पायांत न संपणारं त्राण आहे !

विश्‍वास ठेवा, विश्‍वास ठेवा,

नवा दिवस प्रकाश घेऊन येतो आहे;

नवा दिवस विकास घेऊन येतो आहे !!

« PreviousChapter ListNext »