Bookstruck

अणुरेणूतुनि शब्द प्रगटती ...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अणुरेणूतुनि शब्द प्रगटती... ’चला चला पुढती’

विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती

नवयुग आले प्रभा तयाची पहा दिसत दिव्य

शून्यामधुनी विश्‍व उभारु जिद्‌द असे भव्य

हृदयांतरिच्या अशांततेचा वणवा झणि विझला

उत्कर्षाचा अन् प्रगतीचा मार्ग नवा दिसला

नवी चेतना अंतरी स्फुरली दुबळेपण गेले

नैराश्याच्या होळीमधुनी तेज नवे आले

मानवतेच्या मार्गावरती उठती जरि ज्वाला

अमरत्वाची फुले वेचुनी गुंफूया माला

नको खिन्नता...नको दीनता

नवसूर्य पहा उगवतो

उत्कर्ष पहा झळकतो

संघर्ष पहा बहरतो

नसानसांतुन जोश उसळतो नव आशा चित्‍ती

अणुरेणूतुनि शब्द प्रगटती...’चला चला पुढती’

« PreviousChapter ListNext »