Bookstruck

आला श्रावण पुन्हा नव्याने...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आला श्रावण पुन्हा नव्याने

होऊन चिंब विभोर

नाचतो, थुई थुई मनमोर !

लेणे लेवुनी अंगी भर्जरी

येति सरीवर सरी कितीतरी

कधी तुषार, तर कधी सांडती

सुरेख थेंब टपोर

नाचतो, थुई थुई मनमोर !

सरीत भिजती केशर उन्हे

जणू दुपारी पडे चांदणे

बघून हसले, मन हर्षाने

भरुन येई शिगोर

नाचतो, थुई थुई मनमोर !

रंग मनाचे उजळुन येती

गंध फुलांचे त्यात मिसळती

इंद्रधनूही नभी अंगणी

हळूच येई समोर

नाचतो, थुई थुई मनमोर !

« PreviousChapter ListNext »