Bookstruck

ऋतुचक्र सरकले काळे मेघ न...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ऋतुचक्र सरकले

काळे मेघ नभी आले

त्यांनी अनंत हातांनी

कसे मोती उधळले

सूर्य लपे ढगाआड

वारा धावून शोभतो

ढगा-वार्‍याच्या मस्तीत

कसा पाऊस पडतो

सृष्‍टी मांडे लपंडाव

सारा खेळाचाच नूर

धरित्रीच्या कुशीतून

डोकावतो तृणांकूर

« PreviousChapter ListNext »