Bookstruck

इथे काय रुजतं ? मातीखाल...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

इथे काय रुजतं ?

मातीखाली निजतं

पाण्याने भिजतं

इथे आहे इवलं

सुरेखसं बीज !

एवढासा कोंब

हळूच येईल वर,

सूर्य म्हणेल त्याला

माझा हात धर.

अंगाई-गाणं

वारा गाईल त्याला,

झुलता झुलता

पानं येतील त्याला.

इवल्याशा रोपाचं

झाड येईल छान,

फुला-फळांनी

बहरेल रान.

« PreviousChapter ListNext »