Bookstruck

एक फूल जागं झालं दोन ...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एक फूल जागं झालं

दोन थेंब दंव प्यालं ॥

फुलाने असा घेतला श्‍वास

अत्‍तराचा सुटला वास ॥

चांदण्यांची घेऊन शाल

फुलाने धरला वार्‍याशी ताल ॥

लाल लाल ओठ कसे

पाकळ्यांमधून हळूच हसे ॥

त्यानं घेतलं पांघरुन धुकं

रान झालं मुकं मुकं ॥

« PreviousChapter ListNext »