Bookstruck

हे सुंदर , किति चांदणं ...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

हे सुंदर, किति चांदणं

अहा ! हे सुंदर किति चांदणं

निळ्या-जांभळ्या मखमालीवर

मोत्यांचं सांडणं ॥

चमचम तारे तळ्यातले

भिरभिर वारे मळ्यातले

वर्ख पांघरुन नदीत झिरमिर

लाटांचं रांगणं ॥

रेशिम शेले घनावरी

धार दुधाची वनावरी

झळकत डोलत झाडांमधुनी

चंदेरी तोरणं ॥

धरतीवरती चहूकडे

चांदफुलांची रास पडे

फुलाफुलांसम हसा सदा हे

चंद्राचं सांगणं ॥

अहा ! हे सुंदर किति चांदणं ॥

« PreviousChapter ListNext »