दिवसभर पावसात असून , सा...

दिवसभर पावसात असून, सांग ना आई

झाडाला खोकला कसा होत नाही ?

दिवसभर पावसात खेळून, सांग ना आई

वारा कसा जराही दमत नाही ?

रात्रभर पाढे म्हणून, सांग ना आई

बेडकाचा आवाज कसा बसत नाही ?

रात्रभर जागून सुद्धा, सांग ना आई

चांदोबा झोपी कसा जात नाही ?

दिवसभर काम करून, सांग ना आई

तुला मुळी थकवा कसा येत नाही ?

गीत -  श्रीनिवास खळे