Bookstruck

विदूषकाचे हे डोळे किती...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

विदूषकाचे हे डोळे

किती किती बोलके

दोरीवरी खेळताना

हाताचे इशारे म्होरके

अंगरखा पुराणा

वरी नक्षी कोरलेली

रंगांच्या बुट्‌टीने

चेहरा झाकलेला

उडया मारताना

श्‍वासांचीच दाटी

टोपी हाले आणि

गोंडे बेरकी

घामाने चिंब, दुखले

शरीर जरीही

सुखाचीच टोपी

दुसर्‍याच्या शिरी

हसणे एकाचे अन्

रडणे दुसर्‍याचे

जगाची अशीही

रीत बेगडी

« PreviousChapter ListNext »