Bookstruck

भाषातरकारांची प्रस्तावना 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
हें भाषांतर प्रो. बापट [आर्यभूषण प्रेस, १९२४] यांच्या सुत्तनिपाताच्या संस्करणावरून करण्यांत आलें आहे. पालि टेक्स्ट सोसायटीच्या संस्करणांत आणि प्रो. बापट यांच्या संस्करणांत मुळांत फारसा फरक नाहीं. तरी प्रो. बापट यांचें संस्करण नागरी लिपींत असल्याकारणानें त्याच्या बरोबरच हें भाषांतर वाचणें हिन्दी वाचकांना सोयिस्कर होईल.

पालि वाङ्मयांत सुलभ रीतीनें प्रवेश व्हावा, या हेंतूनें हें भाषांतर केलें आहे. त्यामुळें कित्येक ठिकाणीं तें दूरान्वय झालें आहे; आणि कदाचित् सामान्य वाचकांना क्लिष्टही वाटेल. पण हें भाषांतर आहे आणि रूपांतर नव्हे हें लक्षांत ठेवलें पाहिजे. साध्या भाषेंत नुसतें रूपांतर केलें तर त्यावरून मूळ श्लोकांचा अर्थ सुलभपणें लावतां यावयाचा नाहीं. ज्याला संस्कृत भाषा चांगली अवगत आहे, पण पालि येत नाहीं, त्याला स्वत:च्या प्रयत्‍नानेंच पालीचा अभ्यास करण्याकरितां या भाषांतराचा चांगला उपयोग होईल अशी आशा बाळगणें असांप्रत होणार नाही.

धर्मानंद कोसंबी
« PreviousChapter ListNext »