Bookstruck

सुत्तनिपात 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेत :-

११ यो नाच्चसारी न पच्चसारी सब्बं वितथमिदं ति वीतरागो।
सो भिक्खु जहाति ओरपारं उरगो जिण्णमिव तचं पुराणं ।।११।।

१२ यो नाच्चसारी न पच्चसारी सब्बं वितथमिदं ति वीतदोसो।
सो भिक्खु जहाति ओरपारं उरगो जिण्णमिव तचं पुराणं ।।१२।।

१३ यो नाच्चसारी न पच्चसारी सब्बं वितथमिदं ति वीतमोहो।
सो भिक्खु जहाति ओरपारं उरगो जिण्णमिव तचं पुराणं ।।१३।।

मराठीत अनुवाद :-

११. जो पुढें धांव घेत नाहीं व मागेंही पडत नाहीं, आणि (प्रापंचिक) वस्तु जात जशी भासते तशी खरोखर नाहीं असें जो जाणून वीतराग होतो तो भिक्षु, सर्प जसा जीर्ण झालेली जुनी कातडी टाकून जातो, तद्वत् इहपरलोक सोडून जातो. (११)

१२. जो पुढें धांव घेत नाहीं व मागेंही पडत नाहीं, आणि (प्रापंचिक) वस्तुजात जशी भासते तशी खरोखर नाहीं असें जाणून वीतद्वेष होतो तो भिक्षु, सर्प जसा जीर्ण झालेली जुनी कातडी टाकून जातो, तद्वत् इहपरलोक सोडून जातो. (१२)

१३. जो पुढें धांव घेत नाहीं व मागेंही पडत नाहीं, आणि (प्रापंचिक) वस्तुजात भासते तशी खरोखर नाहीं असें जो जाणून वीतमोह होतो तो भिक्षु, सर्प जसा जीर्ण झालेली जुनी कातडी टाकून जातो, तद्वत् इहपरलोक सोडून जातो. (१३)

पाली भषेत :-

१४ यस्सानुसया न सन्ति कोचि मूला अकुसला समूहतासे।
सो भिक्खु जहाति ओरपारं उरगो जिण्णमिव तचं पुराणं ।।१४।।

१५ यस्स दरथजा१ (१ म.- उरगजा.) न सन्ति केचि ओरं आगमनाय पच्चयासे।
सो भिक्खु जहाति ओरपारं उरगो जिण्णमिव तचं पुराणं ।।१५।।

१६ यस्स वनथजा न सन्ति केचि विनिबन्धाय भवाय हेतुकप्पा।
सो भिक्खु जहाति ओरपारं उरगो जिण्णमिव तचं पुराणं ।।१६।।

मराठीत अनुवाद :-

१४. ज्याच्या अन्त:करणांत अनुशय१ [१. अनुशय म्हणजे दडून राहणारे पापसंस्कार- ते सात आहेत, राग, द्वेष, मान (मिथ्या-) दृष्टि, शंका, पुनर्जन्माचा लोभ व अविद्या.] मुळींच राहिले नाहींत, आणि अकुशलाचीं मुळें२ (अकुशलाचीं मुळें तीन- लोभ, द्वेष आणि मोह.) उपटून टाकण्यांत आलीं आहेत तो भिक्षु, सर्प जसा जीर्ण झालेली जुनी कातडी टाकून जातो, तद्वत् इहपरलोक सोडून जातो. (१४)

१५. इहलोकीं पुनर्जन्माला कारणीभूत असे तृष्णेपासून उद्भवलेले संस्कार राहिले नाहींत तो भिक्षु, सर्प जसा जीर्ण झालेली जुनी कातडी टाकून जातो, तद्वत् इहपरलोक सोडून जातो. (१५)

१६. ज्याच्यामध्यें भवबन्धनाला कारणीभूत असे तृष्णेपासून उद्भवलेले संस्कार राहिले नाहींत तो भिक्षु, सर्प जसा जीर्ण झालेली जुनी कातडी टाकून जातो, तद्वत् इहपरलोक सोडून जातो. (१६)
« PreviousChapter ListNext »