Bookstruck

सुत्तनिपात 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेत :-

२१ बद्धा हि भिसी१ (१ म.- भिसि.) सुसंखता२ (२ म.-खाता.) (इति भगवा)
तिण्णो पारगतो३ (३ म.-पारंगतो.) विनेय्य ओघं।
अत्थो भिसिया व विज्जति
अथ चे पत्थयसी पवस्स देव।।४।।

२२ गोपी मम अस्सवा अलोला (इति धनियो गोपो)
दीघरत्तं४ (४ म.-दि.) संवासिया मनापा।
तस्सा न सुणामि किंचि पापं
अथ चे पत्थयसी पवस्स देव।।५।।

२३ चित्तं मम अस्सवं विमुत्तं (इति भगवा)
दीघरत्तं५ (५ म.-दि.) परिभावितं सुदन्तं।
पापं पन मे न विज्जति
अथ चे पत्थयसी पवस्स देव।।६।।

मराठीत अनुवाद  :-

२१. “माझा ताफा बांधून चांगला तयार आहे.” असें भगवान् म्हणाला,- “मी ओघ उतरून पार गेलों आहे, आतां ताफ्याचें कारण राहिलें नाहीं, तर हे मेघराजा, तुझी इच्छा असल्यास खुशाल वर्षाव कर!” (४)

२२. “माझी गोपी आज्ञाधारक आणि स्थिर मनाची आहे”- असें धनिय गोप म्हणाला,-“चिरकाल ती मजबरोबर राहत असून मला प्रिय आहे, तिच्यांत कोणतेंही वाईट असल्याचें माझें ऐकिवांत नाहीं, तर हे मेघराजा, तुझी इच्छा असल्यास खुशाल वर्षाव कर!” (५)

२३. “माझें चित्त माझ्या ताब्यांत आहे, व तें विमुक्त आहे” असें भगवान् म्हणाला,-“तें चिरकाल अभ्यासानें भावित आणि संयमित आहे, माझ्यांत पाप नाहीं, तर हे मेघराजा, तुझी इच्छा असल्यास खुशाल वर्षाव कर!” (६)
« PreviousChapter ListNext »