Bookstruck

सुत्तनिपात 19

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेत :-

७८ कायगुत्तो वचीगुत्तो आहारे उदरे यतो।
सच्चं करोमि निद्दानं सोरच्चं मे पमोचनं।।३।।

७९ विरियं मे धुरधोरय्हं१ (१ अ.-धोरेय्य.) योगक्खेमाधिवाहनं।
गच्छति अनिवत्तन्तं यत्थ गन्त्वा न सोचति।।४।।

८० एवमेसा कसी कट्ठा सा होति अमतप्फला।
एतं कसिं कसित्वान सब्बदुक्खा पमुञ्चति।।५।।

अथ खो कसिभारद्वाजो ब्राह्मणो महतिया कंसपातिया पायासं वडे्ढत्वा भगवतो उपनामेसि—भुञ्जत्तु भवं गोतमो पायासं, कस्सको भवं, यं हि भवं गोतमो अमतफलं कसिं कसती ति।

मराठीत अनुवाद :-

७८. कायेचें आणि वाचेचें मी रक्षण करतों. उदरनिर्वाहाच्या आहारांत संयमित राहतों. सत्य हें माझें निंदण व संतोष ही सुट्टी. (३)

७९. धुरा वाहणारा माझा उत्साह तो योगक्षेमाभिमुख (निर्वाणाभिमुख) जातो व तेथें गेल्यावर तो परत येत नाहीं व (माझ्यासारखा शेतकरी) शोकरहित होतो. (४)

८०. याप्रमाणें शेती केली असतां, ती अमृतफलदायक होते. अशी शेती करून सर्व दु:खांपासून (मनुष्य) मुक्त होतो. (५)

तेव्हां कृषिभारद्वाज-ब्राह्मणानें मोठ्या कांश्याच्या ताटांत पायस वाढून तो-भवान् गोतम पायसाचा स्वीकार करो; भवान् शेतकरी आहे. कां कीं, भवान् गोतम अमृतफलदायक शेती करतो-असें म्हणून भगवन्तापुढें केला.
« PreviousChapter ListNext »