Bookstruck

सुत्तनिपात 23

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेत :-

९५ इति हेतं विजानाम दुतियो सो पराभवो।
ततियं भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखं।।५।।

९६ निद्दासीली सभासीली अनुट्ठाता च यो नरो।
अलसो कोधपञ्ञाणो तं पराभवतो मुखं।।६।।

९७ इति हेतं विजानाम ततियो सो पराभवो।
चतुत्थं भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखं।।५।।

९८ यो मातरं वा पितरं वा जिण्णकं गतयोब्बनं।
पहु१ (१. रो.- पहू.) सन्तो न भरति तं पराभवतो मुखं।।८।।

९९ इति हेतं विजानाम चतुत्थो सो पराभवो।
पञ्चमं भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखं।।९।।

मराठीत अनुवाद :-

९५. हा दुसरा पराभव आम्हांस समजला. भगवन् पराभवाचें तिसरें कारण कोणतें तें सांग. (५)

९६. निद्रावश, सभाप्रिय, प्रयत्‍न न करणारा, आळशी आणि क्रोधाविष्ट असा जो मनुष्य, तें (त्याच्या) पराभवाचें कारण होय. (६)

९७. हा तिसरा पराभव आम्हांस समजला. भगवन् चवथें पराभवाचें कारण कोणतें तें सांग. (७)

९८. जो समर्थ असून वयातीत वृद्ध आईचा किंवा बापाचा संभाळ करीत नाहीं, तें (त्याच्या) पराभवाचें कारण होय. (८)

९९. हा चवथा पराभव आम्हांस समजा. भगवन्, पांचवें पराभवाचें कारण कोणतें तें सांग. (९)
« PreviousChapter ListNext »