Bookstruck

सुत्तनिपात 25

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेत :-

१०५ इति हेतं विजानाम सप्तमो सो पराभवो।
अट्ठमं भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखं।।१५।।

१०६ इत्थिधुत्तो सुराधुत्तो अक्खधुत्तो च यो नरो।
लद्धं लद्धं विनासेति तं पराभवतो मुखं।।१६।।

१०७ इति हेतं विजानाम अट्ठमो सो पराभवो।
नवमं भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखं।।१७।।

१०८ सेहि दारोहिऽसन्तुट्ठो१ (१. म.-दारेद्य, सी.-संतुट्ठो) वेसियासु पदिस्सति।
दिस्सति परदारेसु तं पराभवतो मुखं।।१८।।

१०९ इति हेतं विजानाम नवमो सो पराभवो।
दसमं भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखं।।१९।।

मराठीत अनुवाद :-

१०५ हा सातवा पराभव आम्हांस समजला. भगवन्, आठवें पराभवाचें कारण कोणतें तें सांग. (१५)

१०६ स्त्रीव्यसनी, दारुबाज व जुगारी होऊन जो मनुष्य जें जें मिळेल तें तें घालवितो, तें (त्याच्या) पराभवाचें कारण होय. (१६)

१०७ हा आठवा पराभव आम्हांस समजला. भगवन्, नववें पराभवाचें कारण कोणतें तें सांग. (१७)

१०८ स्वस्त्रीच्या संगतींत संतोष न मानतां जो वेश्यागमन आणि परदारागमन करतो, तें (त्याच्या) पराभवाचें कारण होय. (१८)

१०९ हा नववा पराभव आम्हांस समजला. भगवन्, दहावें पराभवाचें कारण कोणतें तें सांग. (१५)
« PreviousChapter ListNext »