Bookstruck

सुत्तनिपात 30

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेत  :-

१३३ रोसको कदरियो च पापिच्छो मच्छरी सठो।
अहिरिको अनो प्पी तं जञ्ञा वसलो इति।।१८।।

१३४ यो बुद्धं परिभासति अथ वा तस्स सावकं।
परिब्बाजं गहट्ठं वा तं जञ्ञा वसलो इति।।१९।।

१३५ यो वे अनरहा सन्तो अरहं पटिजानति।
चोरो सब्रह्मके लोके एस खो वसलाधमो।
एते खो वसला वुत्ता मया वो ये पकासिता।।२०।।

१३६ न जच्चा वसलो होति न जच्चा होति ब्राह्मणो।
कम्मुना वसलो होति कम्मुना होति ब्राह्मणो।।२१।।

१३७ तदमिनाऽपि जानाथ यथा मेदं निदस्सनं।
चण्डालपुत्तो सोपाको मातंगो इति पिस्सुतो।।२२।।

मराठीत अनुवाद :-

१३३. जो दुसर्‍यावर रागावणारा, कृपण, असदिच्छ, मत्सरी, शठ, निर्लज्ज व लोकापवादभयरहित, त्याला वृषल समजावें. (१८)

१३४. जो बुद्धाला, त्याच्या श्रावकाला अथवा (इतर) परिव्राजकाला किंवा गृहस्थाला शिव्या देतो, त्याला वृषल समजावें. (१९)

१३५. जो अरहन्त नसून आपणांस अरहन्त म्हणवितो तो सर्व जगांत चोर होय; तो वृषलाधम होय. हे वृषल आहेत, हें मीं तुम्हांस सांगून समजावून दिलें आहे. (२०)

१३६. जन्मानें वृषल होत नाहीं व जन्मानें ब्राह्मण होत नाहीं. कर्मानें वृषल होतो व कर्मानें ब्राह्मण होतो. (२१)

१३७. याला मी एक उदाहरण देतों. त्यानेंही ही गोष्ट समजून येण्याजोगी आहे. कुत्र्याचें मांस खाणारा चाण्डालपुत्र मातंग प्रसिद्ध होऊन गेला. (२२)
« PreviousChapter ListNext »