Bookstruck

सुत्तनिपात 60

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेत :-

२९१ अञ्ञत्र तम्हा समया उतुवेरमणिं पति।
अन्तरा मेथुनं धम्मं नास्सु गच्छन्ति ब्राह्मणा।।८।।

२९२ ब्राह्मचरियं च सीलं च अज्जवं मद्दवं तपं।
सोरच्चं१(१ म.-सोरज्जं.) अविहिंस च खन्तिं चापि अवण्णयुं।।९।।

२९३ यो नेसं परमो आसि ब्राह्मा दळ्हपरक्कमो।
स वापि२(२ सी.-चापि.) मेथुनं धम्मं सुपिनन्तेन नागमा।।१०।।

२९४ तस्सवत्तमनुसिक्खन्ता इधेके विञ्ञुजातिका।
ब्राह्मचरियं च सीलं च खन्तिं चापि अवण्णयुं।।११।।

२९५ तण्डुलं सयनं वत्थं सप्पितेलं च याचिय।
धम्मेन समुदानेत्वा३(३ म., अ.-समोधानेत्वा.) ततो यञ्ञमकप्पयुं।
उपट्ठितस्मिं यञ्ञस्मिं नास्सु गावो हनिंसु ते।।१२।।

मराठीत अनुवाद :-


२९१. ऋतुकालाशिवाय अन्य समयीं, मध्येंच, ते ब्राह्मण स्त्रीसंग करीत नसत. (८)

२९२. ब्रह्मचर्य, शील, आर्जव, मार्दव, तप, समाधान, अहिंसा आणि क्षान्ति यांची ते स्तुति करीत. (९)

२९३. ब्रह्मा म्हणून जो त्यांचा दृढपराक्रमी पुढारी होता, त्यानें स्वप्नांत देखील स्त्रीसंग केला नाही. (१०)

२९४. त्याचें प्रत पालन करणारे कांहीं सुज्ञ (ब्राह्मण) हल्लीही ब्रह्मचर्य, शील व क्षान्ति यांची स्तुति करतात. (११)

२९५. ते (प्राचीन ब्राह्मण) तांदूळ, बिछाईत, वस्त्र, तूप, तेल हे पदार्थ मागून घेऊन व न्याय्य मार्गानें गोळा करून यज्ञ करीत असत. आणि यज्ञ चालूं झाला असतांना त्या यज्ञांत ते गाई मारीत नसत. (१२)
« PreviousChapter ListNext »