Bookstruck

सुत्तनिपात 78

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेत :-

३८६ न वे१(१ म.-नो चे, अ.-नो वे.) विकाले भिक्खु। गामं च पिण्डाय चरेय्य काले।
अकालचारिं हि सजन्ति संगा। तस्मा विकाले न चरन्ति बुद्धा।।११।।

३८७ रूपा त सद्दा च रसा च गंधा। फस्सा च ये संमदयन्ति२(२ म.-संदमयन्ति) सत्ते।
एतेसु धम्मेसु विनेय्य छन्दं। कालेन सो पविसे३((?३) म.-पाविसे.) पातरासं।।१२।।

३८८ पिण्डं च भिक्खु समयेन लद्धा। एको पटिक्कम्म रहो निसीदे।
अज्झत्तचिन्ती न मनो बहिद्धा। निच्छारये संगहितऽत्तभावो४(४रो., अ.-संगहीत)।।१३।।

३८९ सचेऽपि सो सल्लपे सावकेन। अञ्ञेन वा केनचि भिक्खुना वा।
धम्मं पणीतं तमुदाहरेय्य। न पेसु५णं(५ सी.-पेसुनं.) नोऽपि परूपवादं।।१४।।

मराठीत अनुवाद :-

३८६. भिक्षूनें अकालीं भिक्षेला जाऊं नये. त्यानें गांवांत वेळींच भिक्षेला जावें; कारण अकालीं भिक्षेला जाणार्या ला संसर्ग उत्पन्न होतात. म्हणूनच बुद्ध (ज्ञान प्राप्त झालेले) अकालीं भिक्षेला जात नसतात. (११)

३८७. रूप, शब्द, रस, गन्ध आणि स्पर्श, हे जे प्राण्यांना मोहांत पाडतात—अशा विषयांत आसक्ति सोडून त्यानें जेवणांसाठी वेळींच गावांत१ (१. भिक्षूनें मध्याह्नीच्या आधीं जेवण करावें असा नियम आहे. म्हणून ह्या जेवणास प्रातराश असें संबोधिलें आहे. तो जेथें मिळतो त्या गांवासही हेंच नांव दिलें आहे.) जावें. (१२)

३८८. वेळेवर मिळालेली भिक्षा ग्रहण करून तेथून निघून त्यानें एकान्तांत बसावें; अध्यात्मचिन्तन करणारा व एकाग्रचित्त होऊन त्यानें आपल्या मनाला बाहेर जाउं देऊं नये.(१३)

३८९. तो जर श्रावकाबरोबर अथवा दुसर्या  भिक्षूबरोबर बोलूं लागला, तर त्यानें उत्तम धर्म तेवढा बोलावा; चहाड्या करूं नये किंवा दुसर्या ला दोष देऊं नये.(१४)
« PreviousChapter ListNext »