Bookstruck

सुत्तनिपात 81

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेत :-

४०४ धम्मेन मातापितरो भरेय्य। पयोजये धम्मिकं सो वणिज्जं।
एतं गिही वत्तयं अप्पमत्तो। सयंपभे१(१ म.-सयंपमा(१).) नाम उपेति देवे ति।।२९।।

धम्मिकसुत्तं निट्ठितं।


चूळवग्गो दुतियो।
तस्स वग्गस्स उद्दानं-


रतनं आमगन्धं च हिरि२(२ रो.-हिरि च. ) मंगलमुत्तमं। सूचिलोभो धम्मचरिया पुन ब्राह्मणधम्मिकं।
नावा च सुत्तं किंसील-उट्ठानं अथ राहुलो। कप्पो च परिब्बाजो३( ३ सी.-परिब्बाजं च.) धम्मिको च पुनापरं।
चुद्दसेतानि सुत्तानि चुलवग्गो ति वुच्चति।

मराठीत अनुवाद :-

४०४. धर्ममार्गानें आईबापांचें पालन करावें, व धार्मिकपणें व्यापार करावा. अशा रीतीनें जर गृहस्थ सावधपणें वागला तर तो स्वयंपभ नांवाच्या देवलोकी जन्म पावतो. (२९)

धम्मिकसुत्तं समाप्त

चूळवग्ग दुसरा समाप्त

त्याची अनुक्रमणिका—रतन, आमगन्ध, हिरी, मंगल, सूचिलोम, धम्मचरिया, ब्राह्मण-धम्मिक, नावा, किंसील, उट्ठान, पाहुल, कप्प, परिब्बाजक, आणि धम्मिक—हीं चौदा सुत्तें मिंळून चूळवग्ग होतो.

पाली भाषेत :-

महावग्गो ततियो
२७
[१. पब्बज्जासुत्तं]

४०५ पब्बज्जं कित्तयिस्सामि यथा पब्बाजि चक्खुमा।
यथा वीमंसमानो सो पब्बज्जं समरोचयि।।१।।

४०६ संबाधोऽयं१(१ म.-संबाधायं) घरावासो रजस्सायतनं इति।
अब्भोकासो च पब्बाज्जा इति दिस्वान पब्बजि।।२।।

४०७ पब्बजित्वान कायेन पापकम्मं विवज्जयि।
वचीदुच्चरितं हित्वा आजीवं परिसोधयि।।३।।

मराठीत अनुवाद :-

महावग्ग तिसरा
२७
[१. पब्बज्जासुत्त]

४०५. त्या चक्षुष्मन्तानें प्रव्रज्या कशी घेतली, व कोणत्या विचारानें त्याला प्रव्रज्या आवडली, हें सांगून त्याच्या प्रव्रज्येचें मी वर्णन करतों.(१)

४०६. गृहवसति म्हणजे गर्दी व घाणीचें आगर आणि प्रव्रज्या म्हणजे मोकळी हवा, असें पाहून त्यानें प्रव्रज्या घेतली.(२)

४०७. प्रव्रज्या घेऊन त्यानें कायेनें पापकर्म वर्ज्य केलें, आणि वाचसिक पाप सोडून आपली उपजीविका शुद्ध ठेविली. (३)
« PreviousChapter ListNext »