Bookstruck

सुत्तनिपात 83

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेत :-

४१७ सुत्वान दूतवचनं भद्दयानेन खत्तियो।
तरमानरूपो निय्यासि येन पण्डवपब्बतो।।१३।।

४१८ स यानभूमिं यायित्वा याना ओरुय्ह खत्तियो।
पत्तिको उपसंकम्म आसज्ज नं उपाविसि।।१४।।

४१९ निसज्ज राजा सम्मोदि कथं सारणियं१(१ रो.- साराणियं.) ततो।
कथं सो वीतिसारेत्वा इममत्थं अभासथ—।।१५।।

४२० युवा च दहरो चासि पठमुप्पत्तिका२( २ सी.- पठमुप्पत्तिया.) सुसु।
वण्णारोहेन संपन्नो जातिमा विय खत्तियो।।१६।।

४२१ सोभयन्तो अनीकग्गं नागसंघपुरक्खतो।
ददामि भोगे भुंजस्सु जातिं चऽक्खाहि पुच्छितो।।१७।।

मराठीत अनुवाद :-

४१७. दूताचें वचन ऐकून तो क्षत्रिय राजा त्वरित उत्तम यानांतून पांडवपर्वताकडे जाण्यास निघाला.(१३)

४१८. यानानें जाण्याचा रस्ता होता तोंपर्यंत यानानें जाऊन, तो क्षत्रिय यानांतून खालीं उतरला, व पायींच त्याच्या जवळ जाऊन बसला.(१४)

४१९. बसून त्या राजानें त्याला कुशल-प्रश्नादिक विचारले, व कुशल प्रश्नांचें भाषण संपवून. तो त्यास याप्रमाणें बोलला—(१५)

४२०. “तूं जवान, लहान, पूर्ववयांत असलेला कुमार आहेस. कान्तीनें आणि बांध्यानें संपन्न असा तूं जातिवन्त क्षत्रियासारखा दिसतोस.(१६)

४२१. तुला मी संपत्ति देतों तिचा उपभोग घे, व हस्तिसंघानें पुरस्कृतत असा तूं माझ्या सोनाग्राला शोभा आण. मात्र मी विचारतों कीं जन्मत: तू कोण आहेस तें तेवढें सांग.” (१७)
« PreviousChapter ListNext »